Greeting Messages

Dussehra Wishes in Marathi 2024

Dussehra Wishes 2024 : दसऱ्यानिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा;

**विजयादशमीच्या शुभेच्छा**:
विजयादशमीच्या या पावन सणासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा संदेश उपयुक्त ठरेल. विजयादशमी, म्हणजेच दसरा, हा एक मोठा सण आहे जो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसर्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचे रूपात ‘सोने’ एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावणाचा वध करून विजय मिळवला होता. या दिवशी रावणाचा पुतळा तयार करून त्याचे दहन केले जाते.

याशिवाय, नवरात्रोत्सवाचा अंतिम दिवस असल्याने देवीचे विसर्जन केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाईट गोष्टींचा अंत करून उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प करतो.

तंत्रज्ञानाच्या युगात, कोणत्याही सणाच्या निमित्ताने सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा उत्साह वाढवला जातो. विजयादशमी आणि दसऱ्याच्या निमित्ताने मराठी भाषेतून शुभेच्छा द्या!

दसऱ्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात, जसे की नवीन वाहन किंवा सोन्याची खरेदी करणे. प्रत्येकजण हा सण कुटुंब, मित्र, आणि नातेवाईकांसह साजरा करतो.

किंवा काही कारणांमुळे तुम्ही आपल्या प्रियजनांना भेटू शकत नसाल, तर खालील शुभेच्छा तुम्हाला उपयुक्त ठरतील.

मान्यतेनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून दुष्टाईचा अंत केला होता. दुसऱ्या मान्यतेनुसार, दुर्गामातेने नऊ दिवस युद्ध केल्यानंतर महिषासुराचा वध केला. ‘दसरा’ शब्दाचा अर्थ ‘दशहरा’ असा होतो; ‘दश’ म्हणजे ‘दहा’ आणि ‘हरा’ म्हणजे ‘पराभव’. माता दुर्गेच्या नऊ रूपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असेही म्हटले जाते.

“आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची पाने देऊन करा साजरा..
दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!”

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी,
दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

 

हा दसरा तुमचे सर्व दुःख आणि संकट जाळून टाकू दे.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

 

भगवान राम तुम्हाला सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याचे महान सामर्थ्य आणि धैर्य देवो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा दसरा सण
सोने लुटून हे शिलगण
हर्षाचे उजळू द्या अंगण
सर्वांना दसरा व विजयदशमीच्या मंगलमय शुभेच्छा!

सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर यशाचे! प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याच्या शुभेच्छा!

झाली असेल चूक तरी या निमिनत्ताने आता ती विसरा वाटून प्रेम एकमेकांस साजरा करु यंदाचा हा दसरा!
सर्वांना शुभ दसरा.

दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने,
या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने!
दसरा, विजयदशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा! (VijayaDashami Wishes In Marathi )

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी
सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

आपट्याची पाने, झेंडुची फुले
घेवूनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध,
सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद
विजयादशमी, दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या शुभदिनी केवळ रावणाच्या पुतळ्याचेच दहन नाही, तर आपल्यातील दुर्गुणांचेही दहन करूया.
रामाचे हृदयात स्मरण करून धर्ममार्गावर चालण्यास सुरुवात करूया.
तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा!
दसऱ्याच्या शुभेच्छा | Dussehra Quotes In Marathi

तांबडं फुटलं,
उगवला दिन,
सोन्यानी सजला,
दसऱ्याचा दिन!

आला आला दसरा,
दु:ख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा
साजरा करु दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Show More

Related Articles

Back to top button