Navratri Wishes in Marathi
Navratri Wishes 2024 : नवरात्रीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
**नवरात्री शुभेच्छा 2024 मराठीत**:
3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाची सुरूवात होणार आहे. या काळात दुर्गा देवीच्या 9 रूपांची विधीवत पूजा केली जाते. पुढील 9 दिवस देशभरात नवरात्र उत्साहात साजरी होईल. या नवरात्रीनिमित्त तुमच्या प्रियजनांना WhatsApp आणि Facebook च्या माध्यमातून मराठीतून खास शुभेच्छा द्या!
**नवरात्री** हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, तर दहावा दिवस ‘दसरा’ म्हणून साजरा होतो. नवरात्री वर्षातून चार वेळा येते, ज्यामध्ये माघ, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा महोत्सव साजरा केला जातो. यंदा नवरात्रीत देवी पालखीत विराजमान होऊन भक्तांच्या घरी येईल. चला, नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन आणि उत्सव साजरा करून हा आनंद द्विगुणीत करूया!
पौराणिक कथेनुसार, शारदीय नवरात्रीमध्ये, अश्विन महिन्यात, दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा पराभव करून विजय मिळवला. तेव्हापासून देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. म्हणूनच, नवरात्र उत्सवात नऊ दिवस देवीची पूजा केली जाते.
हिंदू संस्कृतीमध्ये नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. या काळात देवीच्या विविध रूपांची श्रद्धेने पूजा केली जाते आणि सर्वत्र भक्तिभावाने जल्लोष केला जातो. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना आणि प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी खालील सुंदर संदेश पाठवू शकता.
लक्ष्मीचा हात असो सरस्वतीची साथ असो गणपतीचा वास असो आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीचे हे नऊ दिवस आणि नऊ रात्री तुमच्यासाठी चांगले आरोग्य आणि भाग्य घेऊन येवो.
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते ।
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!नारी तू नारायणी। नारी तू सबला।।
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी। नमितो आम्ही तुजला।। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!